मराठी

आपल्या उपकरणावर ही डाउनलोड सेवा समर्थन देत नसली तरी त्यावर डाउनलोड करण्याविषयीची माहिती पाहता येऊ शकते. कंप्युटरवर डाउनलोड करण्यासाठी लागणाऱ्या लिंक्स ई-मेलवरून पाठविल्या जाऊ शकतात.

COOLPIX B700 फर्मवेअर

आपली परिचालन प्रणाली निवडा.

  • Windows
  • Mac OS

हा फर्मवेअर अद्यतन कार्यक्रम वरती सूचीबद्ध केलेल्या ग्राहक-मालकी उपकरणासाठी आहे ("प्रभावित उत्पादन"), आणि तो केवळ खाली सूचीबद्ध केलेल्या अंतिम वापरकर्ता परवाना करार (EULA) च्या स्वीकृतीनंतरच प्रदान केले जातो. “स्वीकारा” निवडून आणि “डाउनलोड” क्लिक करून, आपण आणि NIKON कॉर्पोरेशन ("NIKON") दरम्यान अंतिम वापरकर्ता परवाना करार स्थापन करणाऱ्या EULA अटी आणि नियम यांना आपण स्वीकृती देणे आवश्यक ठरते. डाउनलोड सुरू करण्यापूर्वी कराराच्या अटी आपणास समजल्या आहेत याची खात्री करा.

  • • ही सेवा COOLPIX B700 कॅमेऱ्यांसाठी लागणारे फर्मवेअर 1.6 वर अद्यतन करण्यासाठी वापरले जाऊ शकणारे सॉफ्टवेअर पुरवते. पुढे जाण्यापूर्वी, कॅमेऱ्याचे फर्मवेअर संस्करण पहा. वरती सूचीबद्ध केलेले फर्मवेअर आधीपासूनच प्रस्थापित असल्यास, आपणास हे अद्यतन डाउनलोड किंवा प्रस्थापित करण्याची आवश्यकता नाही.
  • • या अद्यतनामध्ये पूर्वीच्या अद्यतनांमध्ये केलेले सर्व बदल समाविष्ट आहेत.
  • • पुढे जाण्यापूर्वी खाली दिलेली माहिती वाचा.
फर्मवेअर संस्करण 1.5 ते 1.6 यांच्यामध्ये झालेले बदल
  • • पुढील समस्यांचे निवारण केले:
    • - SnapBridge Download pictures (डाउनलोड चित्रां) लघुचित्र सूचीमध्ये ज्या क्रमाने चित्रे प्रदर्शित केली जायची, तो क्रम काहीवेळा बदलायचा.
      नोट: 2.8.3 किंवा त्यानंतरच्या संस्करणावर SnapBridge अद्ययावत करा.
पूर्वीच्या संस्करणांपासून झालेले बदल
फर्मवेअर संस्करण 1.3 ते 1.5 यांच्यामध्ये झालेले बदल
  • • SnapBridge संस्करण 1.2 आणि त्यानंतरच्या संस्करणांसाठी समर्थन समाविष्ट केले.
  • • पुढील समस्यांचे निवारण केले:
    • - प्रतिमेच्या दर्जासाठी “U (User settings (वापरकर्ता सेटिंग्स)) मोड”वर RAW + Fine किंवा RAW + Normal मध्ये चलचित्रे ध्वनिमुद्रित केल्यानंतर, user settings जतन करा वापरुन संग्रहित केलेला प्रतिमा दर्जा पर्याय RAW वर बदलेल.
    • - जर बहु उघडीपीसाठी चालू निवडून user settings जतन करा वापरुन वापरकर्ता सेटिंग्ज जतन केली असतील आणि मोड तबकडी “U (User settings (वापरकर्ता सेटिंग्स)) मोड”वर फिरवून कॅमरा बंद केला असेल तर बहु उघडीप पून्हा बंदवर सेट होईल.
    • - वापरकर्त्याने प्रारंभिक सेटअप दरम्यान भाषा/Language यासाठी पर्याय निवडला मात्र इतर कोणतीही सेटिंग्ज समायोजित केलेली नसली तरी झूम उपलब्ध होत नव्हता.
    • - मध्यांतर समयक छायाचित्रण 10,000 शॉट्सनंतर समाप्त व्हायचे.
    • - कधीकधी ठराविक Android उपकरणांबरोबर कॅमेरा अचूकपणे जोडला जाऊ शकत नव्हता.
फर्मवेअर संस्करण 1.2 ते 1.3 यांच्यामध्ये झालेले बदल
  • संगणकाने चार्ज करा यासाठी बंद निवडले तर AC प्रभारण अनुकूलकाशी जोडणी केल्यानंतर कॅमेरा प्रभारित होण्यास प्रतिबंध करणाऱ्या समस्येचे निवारण केले.
फर्मवेअर संस्करण 1.1 ते 1.2 यांच्यामध्ये झालेले बदल
  • • एका समस्येचे निवारण केल्यामुळे SnapBridge अनुप्रयोगाच्या iOS 10.2 संस्करणामध्ये आणि कॅमेऱ्यामध्ये बेभरवशी कनेक्शन्स तयार झाल्या आहेत.
फर्मवेअर संस्करण 1.0 ते 1.1 यांच्यामध्ये झालेले बदल
  • • SnapBridge अनुप्रयोगाचा वापर करून छायाचित्र आणि चलचित्र स्थानांतरणाची विश्वसनीयता सुधारली.
  • • SnapBridge अनुप्रयोग वापरून सामील केलेला स्थान डेटा कधीकधी योग्यरितीने प्रदर्शित न होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या समस्येचे निवारण केले.
  • • क्वचित कधीतरी कृष्ण-धवल रंगामध्ये छायाचित्रे रेकॉर्ड होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या समस्येचे निवारण केले.
कॅमेरा फर्मवेअर संस्करण पाहणे
  1. कॅमेरा चालू करा.
  2. मेनू प्रदर्शित करण्यासाठी कॅमेर्‍याचे MENU बटण दाबा.
  3. मेनू प्रतीके प्रदर्शित करण्यासाठी मल्टी सिलेक्टर डावीकडे दाबा, नंतर सेटअप हायलाइट करा आणि OK दाबा.
  4. सेटअप मेनूमध्ये फर्मवेअर संस्करण हायलाइट करा आणि कॅमेऱ्याचे फर्मवेअर संस्करण प्रदर्शित करण्यासाठी OK दाबा.
  5. कॅमेरा फर्मवेअर संस्करण तपासा.
  6. कॅमरा बंद करा.
उत्पादन विवरण
नाव COOLPIX B700 फर्मवेअर संस्करण 1.6
समर्थित कॅमेरे COOLPIX B700
समर्थित फर्मवेअर संस्करण संस्करण 1.0-1.5
फाईल नाव F-B700-V16W.exe
ऑपरेटिंग सिस्टिम
  • Microsoft Windows 11
  • Microsoft Windows 10
  • Microsoft Windows 8.1
नोट: कार्ड रीडर किंवा अंगभूत मेमरी कार्ड स्लॉट असलेला संगणक आवश्यक आहे.
सर्वहक्कस्वाधीन Nikon Corporation
अर्काइव्ह प्रकार स्वयं-एक्स्ट्रॅक्टिंग
प्रत्युत्पादन परवानगी नाही
कॅमेरा फर्मवेअर अद्यतन करणे
  1. संगणकाच्या हार्ड डिस्कवर एक फोल्डर तयार करा आणि त्यास आपल्या इच्छेनुसार नाव द्या.
  2. पायरी 1 मध्ये तयार केलेल्या फोल्डरवर F-B700-V16W.exe डाउनलोड करा.
  3. नवीन फोल्डरमधील उप-फोल्डरवर फर्मवेअर एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी F-B700-V16W.exe रन करा. परिणामी मिळणारे फाइल आणि फोल्डर हाइरार्कि खाली दर्शविली आहे:
    • firmware (फर्मवेअर असलेले उप-फोल्डर)
    • firmware.bin (कॅमेरा फर्मवेअर, “firmware” फोल्डरमध्ये स्थित)
  4. कार्ड स्लॉट किंवा कार्ड रीडर याचा वापर करून कॅमेर्‍यामध्ये स्वरूपित केलेल्या मेमरी कार्डवर “firmware” फोल्डरची प्रतिलिपी करा.
    नोट: मेमरी कार्डाच्या रूट (सर्वात वरच्या) डिरेक्टरीमधील “firmware” फोल्डरमध्ये खात्रीपूर्वक प्रतिलिपित करा. जर नवीन फर्मवेअर रूट डिरेक्टरीमधल्या फोल्डरमध्ये ठेवले असेल तर कॅमेरा ते ओळखणार नाही.
  5. कॅमेऱ्यामध्ये मेमरी कार्ड घालून कॅमेरा चालू करा.
  6. सेटअप मेनूमध्ये फर्मवेअर संस्करण निवडा आणि फर्मवेअर अद्यतन पूर्ण करण्यासाठी स्क्रीनवरील सूचनांचे अनुसरण करा.
  7. अद्यतन पूर्ण झाल्यानंतर, कॅमेरा बंद करा आणि मेमरी कार्ड बाहेर काढा.
  8. फर्मवेअर नवीन संस्करणावर अद्यतन झाले आहे याची पुष्टी करा.

नोट: अद्यतन पूर्ण करण्यासाठी आवश्यक उपकरणाविषयी अधिक विस्तृत सूचना किंवा माहितीसाठी खालील pdf फाईल डाउनलोड करा:
CPX_MS_FirmUp_Win_En.pdf (PDF) (0.17 MB)

नोट: आपल्याकरिता अद्यतने Nikon-अधिकृत सेवा प्रतिनिधीद्वारे केले जाऊ शकतात.

उत्पादन विवरण
नाव COOLPIX B700 फर्मवेअर संस्करण 1.6
समर्थित कॅमेरे COOLPIX B700
समर्थित फर्मवेअर संस्करण संस्करण 1.0-1.5
फाईल नाव F-B700-V16M.dmg
ऑपरेटिंग सिस्टिम
  • macOS Monterey संस्करण 12
  • macOS Big Sur संस्करण 11
  • macOS Catalina संस्करण 10.15
  • macOS Mojave संस्करण 10.14
  • macOS High Sierra संस्करण 10.13
  • macOS Sierra संस्करण 10.12
नोट: कार्ड रीडर किंवा अंगभूत मेमरी कार्ड स्लॉट असलेला संगणक आवश्यक आहे.
सर्वहक्कस्वाधीन Nikon Corporation
अर्काइव्ह प्रकार स्वयं-एक्स्ट्रॅक्टिंग
प्रत्युत्पादन परवानगी नाही
कॅमेरा फर्मवेअर अद्यतन करणे
  1. F-B700-V16M.dmg डाउनलोड करा.
  2. खालील फाईल आणि फोल्डर असलेली डिस्क प्रतिमा माउंट करण्यासाठी F-B700-V16M.dmg प्रतिकावर दोनदा क्लिक करा:
    • firmware (फर्मवेअर असलेले उप-फोल्डर)
    • firmware.bin (कॅमेरा फर्मवेअर, “firmware” फोल्डरमध्ये स्थित)
  3. कार्ड स्लॉट किंवा कार्ड रीडर याचा वापर करून कॅमेर्‍यामध्ये स्वरूपित केलेल्या मेमरी कार्डवर “firmware” फोल्डरची प्रतिलिपी करा.
    नोट: मेमरी कार्डाच्या रूट (सर्वात वरच्या) डिरेक्टरीमधील “firmware” फोल्डरमध्ये खात्रीपूर्वक प्रतिलिपित करा. जर नवीन फर्मवेअर रूट डिरेक्टरीमधल्या फोल्डरमध्ये ठेवले असेल तर कॅमेरा ते ओळखणार नाही.
  4. कॅमेऱ्यामध्ये मेमरी कार्ड घालून कॅमेरा चालू करा.
  5. सेटअप मेनूमध्ये फर्मवेअर संस्करण निवडा आणि फर्मवेअर अद्यतन पूर्ण करण्यासाठी स्क्रीनवरील सूचनांचे अनुसरण करा.
  6. अद्यतन पूर्ण झाल्यानंतर, कॅमेरा बंद करा आणि मेमरी कार्ड बाहेर काढा.
  7. फर्मवेअर नवीन संस्करणावर अद्यतन झाले आहे याची पुष्टी करा.

नोट: अद्यतन पूर्ण करण्यासाठी आवश्यक उपकरणाविषयी अधिक विस्तृत सूचना किंवा माहितीसाठी खालील pdf फाईल डाउनलोड करा:
CPX_MS_FirmUp_Mac_En.pdf (PDF) (0.14 MB)

नोट: आपल्याकरिता अद्यतने Nikon-अधिकृत सेवा प्रतिनिधीद्वारे केले जाऊ शकतात.

अंतिम उपभोक्ता परवाना करार

PDF फाईल्स विनामुल्य Adobe® Reader® सॉफ्टवेअर वापरून पाहिल्या जाऊ शकतात.
Adobe® Reader® डाउनलोड करा.